मराठी

क्वीट टोबेको प्रोग्राम

Freedom from Tobacco

डॉ. जागृती चस्मावाला यांच्या क्वीट टोबेको प्रोग्राम यात आपले स्वागत आहे.

प्रिय मित्रमैत्रीनिनो,

कृपया हे पत्रक लक्षपूर्वक वाचा.

यात अतिशय महत्वाची माहिती असून ज्या कोणाला तंबाखू सोडायचा असेल त्याला हे पत्रक व त्यातील माहिती उपयुक्त आहे. पत्रक वाचल्या वर आपण मिळून काय घडवू शकतो हे तुम्हाला कळेल.

प्र.तंबाखूची सवय म्हणजे काय?

यात

 • तंबाखूचे सेवन,चघळणे,
 • धुम्रपानसिगारेट
 • सिगार
 • हुक्का
 • बिडी
 • चिलम वैगेरे.तंबाखूचे पान
 • गुटका
 • मावा
 • पानमसाला चुना व तंबाखू मिश्रण
 • मशेरी
 • तपकीर
 • तंबाखुयुक्त दंतमंजन, देन्त्तोबाक (DENTOBAC), ईपको(IPCO)

वैगेरेचा समाविष्ट आहे.

प्र.मी हि सवय कशी सोडू शकतो?

तुम्ही या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि हा कार्यक्रम पूर्ण करायचा बेत ठरवा. सर्व वयोगटातील स्त्री किवा पुरुष या उपक्रमात सहभागी होवू शकतात.

प्र.३ हा उपचार किती दिवसाचा असतो?

सुमारे २० ते ३० दिवसाचा असतो.

प्र.४ मला किती वेळा डॉक्टरांना भेटावे लागेल?

डॉक्टरांना ३-६ वेळातरी भेटावे लागेल. प्राथमिक चर्चेसाठी आपण आपल्या पत्नी,माता,बहिण किवा
मुलगीयाना बरोबर आणावे.

प्र.५ मी निष्णात डॉक्टरच का निवडावा?

स्वतः सोडण्याचा प्रयत्न करणारे १०० व्यति पैकी फक्त ३ व्यक्तीच यशस्वी होतात. निष्णाताच्या अनुभवाने व व्यावसायिक मार्गदर्शनाने तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

प्र.६ हा उपाय कधी सुरु करू शकतो?

उद्या कराल ते आज करा, आज कराल ते आताच करा!…….

प्र.७ मी खूप वेळा प्रयत्न करून हि अपयशी झालो आहे!

अभिनंदन! हा एक सकारात्मक दृष्टीकोन आहे. व्यावसायिक मार्गदर्शनाने यशस्वी व्हाल.

प्र.८ अधून मधून तंबाखूचे सेवन चालेल का?

अजिबात नाही! यामुळेच तंबाखूची सवय लागते.

प्र.९ मी गेले ४० वर्ष तंबाखूचे सेवन करत आहे, मला हि सवय सोडण्यास यश मिळेल का?

होय नक्कीच! का नाही! प्रयत्न्याने कुणालाहि सहज शक्य आहे.

प्र.१० मला हि सवय सोडायची आहे.,पण एका प्रकारची अस्वस्थता,काळजी तलफ याचे काय करायचे?

या सर्वाना सोडचिठ्ठी लक्षणे म्हणतात. औषध घेतल्याने त्यावर मात देऊ शकतात.

प्र.११ औषध कश्याप्रकारे कार्य करते?

औषधामुळे शारीरिक कमतरता, अस्वस्थता,काळजी व तलफ नाहीसे होतात. तंबाखूपासून
मिळणारा खोटा आनंद व नशा नष्ट होतो. यामुळे तुम्ही तंबाखू सोडू शकतात.

प्र.१२ या उपचाराचं खर्च काय?

या उपचाराचं खर्च तंबाखूच्या खर्चापेक्षा फार कमी असतो.

प्र.१३ या उपक्रमात माझी भूमिका काय असेल?

तुमचा उपक्रम पार पडण्याचा बेत + आमचे मार्गदर्शन = तंबाखूपासून मुक्ती.